पिंपरी (Pclive7.com):- राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सोशल मिडियावर अपशब्द वापरणाऱ्या माथेफिरू विरुद्ध भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने पोलिसांत लेखी तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.
सोशल मीडिया फेसबुकवर केशव पालवाडे नामक युवकाने राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल अपशब्द तसेच त्यांच्या नावाचा एकेरी वारंवार उल्लेख करून अतिशय उर्मट भाषेत बोललेला व्हिडिओ अपलोड केला होता. त्याबद्दल लेखी तक्रार पूजा आल्हाट यांनी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा पदाधिकारी जिल्हा चिटणीस दिनेश यादव, गणेश जवळकर, जिल्हा उपाध्यक्ष पूजा आल्हाट, शिवराज लांडगे, अतुल बोराटे, जिल्हा चिटणीस मुक्ता गोसावी, सोशल मीडिया जिल्हा सहसंयोजक प्रियंका सिंग शहा उपस्थित होत्या.
























Join Our Whatsapp Group