पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात कोरेनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोना बाधित रूग्णांना ऑक्सिजन बेड आणि रेमडिसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. मात्र तरी देखील शहरातील नागरिकांना या भयानक परिस्थितीचे गांभिर्य नसल्याचे दिसून येत आहे. काल शनिवारी (दि.०८ मे) रोजी दिवसभरात शहरात मास्क न लावता फिरणाऱ्या ३६१ जणांवर पोलीसांनी कारवाई केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क न लावता फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. शनिवारी (दि.०८ मे) पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत मास्कच्या आदेशाचा भंग करणाऱ्या ३६१ जणांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यात सर्वाधिक चिंचवड, भोसरी एमआयडीसी आणि हिंजवडी परिसराचा समावेश आहे
नागरिकांनी मास्क वापरावा, असे आवाहन महापालिका आणि पोलिसांकडून केले जात आहे. मात्र, त्याचे उल्लंघन केले जात आहे. मास्क न घालणाऱ्यांवर करण्यात आलेली कारवाई पुढीलप्रमाणे – एमआयडीसी भोसरी (३७), भोसरी (१२), पिंपरी (२५), चिंचवड (६९), निगडी (१६), आळंदी (२१), चाकण (२७), दिघी (०३), सांगवी (१०), वाकड (१२), हिंजवडी (३६), देहूरोड (२५), तळेगाव दाभाडे (१६), चिखली (१४), रावेत चौकी (१२), शिरगाव चौकी (१९), म्हाळुंगे चौकी (०३).
























Join Our Whatsapp Group