पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात उद्या शुक्रवार (दि.२१ मे) रोजी लाभार्थींना ‘कोविशिल्ड’ लसीचा पहिला व दुसरा डोस आठ केंद्रावर मिळणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार वय वर्षे ४५ पुढील लाभार्थ्यांचे ‘कोविशिल्ड’ लसीचा पहिला डोस व ज्या लाभार्थ्यांनी पुर्वी ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस घेतला आहे, त्यांना डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यंत) खालील केंद्रावर ‘कोविशिल्ड’ लसीचा पहिला व दुसरा डोस सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत निकषानुसार उद्या दि. २१/०५/२०२१ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील लसीकरण देण्यात येणार आहे.
खालील ८ केंद्रावर लसीकरण होणार!
यमुनानगर रुग्णालय, तालेरा रुग्णालय, सावित्रीबाई फुले शाळा भोसरी, नवीन जिजामाता रुग्णालय, आचार्य आत्रे सभागृह वायसीएम रुग्णालय जवळ, खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, नवीन आकुर्डी रुग्णालय, आहिल्यादेवी होळकर स्कुल सांगवी रुग्णालय जवळ.
तसेच वरील लसीकरण केंद्रावर वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थीचे लसीकरण करण्यात येणार नाही. त्यामुळे वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थ्यांनी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये व याबाबत महापालिकेला सहकार्य करावे.






















Join Our Whatsapp Group