पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पिंपरी चिंचवड शहर शाखेच्या वतीने कोरोना काळात ज्यांनी जिवाची पर्वा न करता जनमानसांसाठी अमूल्य असे योगदान दिले, अशा लढवय्या योद्ध्यांचा शिवसेना शहर शाखेच्या वतीने महासंसदरत्न खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या शुभहस्ते ‘देवदूत’ पुरस्कार देऊन सन्मानित केले.
यावेळी डॉ. बि. डी. पाटिल, डॉ. विजय गुजर, डॉ. आशुतोष तोडकर, डॉ. संजय मंडलिक, डॉ. अभिजीत शेखर, डॉ. अक्षय अमृतकर सौ. जान्हवी, अजय कदम, सौ. अनिता दिनेश यादव, संजय गायके, रवींद्र भावे, धनंजय होले, दीनानाथ जोशी, प्रदीप सपकाळ या मान्यवरांचा देवदूत पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या पुणे जिल्हा संघटिका सुलभाताई उबाळे, संपर्क प्रमुख वैशालीताई सूर्यवंशी, शिवसेना पिंपरी चिंचवड शहर प्रमुख ऍड. सचिन भोसले, विधानसभा प्रमुख अनंत कोराळे, कामगार नेते इरफान सय्यद, उपजिल्हा संघटिका वैशाली मराठे, शहर संघटिका ऍड उर्मिला काळभोर, विधानसभा संघटिका अनिता तुतारे, विश्वजीत बारणे युवासेना प्रमुख पिंपरी चिंचवड, माजी शहर संघटीका सुनिता चव्हाण, विभाग संघटिका शारदा वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन उपशहर प्रमुख सुधाकर नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश झिळे, राजेंद्र पालांडे, सागर शिंदे, सुनील पालकर, सचिन नलावडे, अमित फडतरे, संजय संधू, प्रशांत तरवटे, चेतन शिरसाठ, अनिरुध्द पालांडे, गौरव केरकर, सचिन कुळे, किरण सोनार आदींनी केले होते.
























Join Our Whatsapp Group