पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव परिसरात कार्यरत असलेल्या रवीदादा भिलारे सोशल फाऊंडेशनतर्फे कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पूरग्रस्तांना मदतीचा हात दिलायं. सुमारे ५०० किलो अन्नधान्यांचे वितरण फाऊंडेशनच्यावतीने नुकतेच करण्यात आले.
महाराष्ट्रातील कोकण भाग तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टी झाल्यामुळे संपूर्ण ठिकाणी महापुराचे संकट निर्माण झाले होते. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली तसेच कोकण किनारपट्टीतील रत्नागिरी, चिपळूण, सिंधुदुर्ग या भागात पावसाने पूर्ण जनजीवन विस्कळीत केलं होतं. अशातच येथील नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत होता.
त्यांच्या खाण्यापिण्याची तसेच त्यांच्या निवाऱ्याची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत होती. त्यामुळे गरज होती समाजाने त्यांना एक मदतीचा हात देण्याची. त्यामुळेच पिंपरी चिंचवड, थेरगाव येथील युवा नेते व सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणारे रवीदादा भिलारे सोशल फाउंडेशन यांच्यातर्फे पूरग्रस्तांना 500 किलो अन्नधान्याचे वितरण करण्यात आले.
या सर्व अन्नधान्याचे कोकण खेड युवाशक्ती या सामाजिक संस्थेला वितरण करण्यात आले. संकटकाळी संकटात जो उभा राहतो तोच खरा देव असतो. याचीच जाणीव ठेवून पिंपरी चिंचवड थेरगाव मधील सामाजिक कार्यकर्ते रवी दादा भिलारे यांनी पूर्ण समाजात एक आदर्शाचा पायंडा घालून दिला आहे. व ज्या नागरिकांना जशी जमेल तेवढी मदत करावी असे देखील आव्हान करण्यात आले आहे.
























Join Our Whatsapp Group