पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील सर्व दुकाने सर्व दिवशी सकाळपासून रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. हॉटेलही रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. त्याचबरोबर कोराना नियमांचे पालन करुन मॉलही उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच मॉलमध्ये प्रवेश मिळणार आहे. याबाबतचा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात दिली. त्यानंतर आज (दि.०८) संध्याकाळी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी शहरासाठी निर्बंधांची नवीन नियमावली जाहीर केली आहे. सदर आदेश उद्या (सोमवार दि.०९) रोजी सकाळपासून लागू होतील.
आयुक्त राजेश पाटील यांनी जाहीर केलेली नवीन नियमावली खालीलप्रमाणे..
१) अत्यावश्यक सेवेची सर्व दुकाने व आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस पूर्ण वेळ सुरु राहतील.
२) अत्यावश्यक सेवेची सर्व दुकाने व आस्थापना वगळता इतर दुकाने व आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस रात्री ०८.०० वाजेपर्यंत सुरू राहतील. (त्या दुकानांची साप्ताहिक सुट्टी वगळून).
३) शॉपिंग मॉल लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण केलेल्या नागरिकांकरिता रात्री ०८.०० वाजेपर्यंत सुरु राहतील. तथापि, नागरिकांनी दोन्ही डोस पूर्ण झालेबाबत प्रमाणपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहील. शॉपिंग मॉल मध्ये काम करणा-या कामगार व इतर व्यक्तीची रॅपिड अँटिजेन चाचणी (RAT) प्रत्येक पंधरा दिवसांनी करणे बंधनकारक राहील. कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी मॉल व्यवस्थापनाची राहील.
४) रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट से आठवड्यातील सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या ५०% क्षमतेने सुरु राहतील. घरपोच सेवा (Home Delivery ट) रात्री ११ पर्यंत सुरु राहतील. सर्व रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट इ. यांना दर्शनी भागावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दिलेल्या सूचनांचे स्टीकर्स लावणे बंधनकारक असेल.
५) जलतरण तलाव व निकट संपर्क येणारे सर्व क्रीडा प्रकार वगळून अन्य इनडोअर व आऊटडोअर खेळ हे नियमितपणे सुरु राहतील.
६) सार्वजनिक उद्याने आठवड्यातील सर्व दिवस नियमित वेळेत सुरु ठेवता येतील.
७) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था यांचे नियमित वर्ग पुढील आदेशापर्यंत पूर्णतः बंद राहतील. मात्र ऑनलाइन शिक्षणास मुभा राहील.
८) स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र /क्लासेस (Couching classes) हे सर्व दिवस रात्री ०८.०० वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या ५०% क्षमतने सुरु राहतील. सदर ठिकाणी प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी यांचे लसीकरण (किमान एक डोस) अनिवार्य आहे.
९) व्यायाम शाळा (Gym), सलून, ब्यूटी पार्लर, स्पा, Wellness centers आसनक्षमतेच्या ५०% क्षमतेने पूर्व नियोजित वेळेनुसार (By appointment) रात्री ०८.०० वाजेपर्यंत सुरू राहतील, सदर ठिकाणी वातानुकुल (A.C) सुविधा वापरता येणार नाही.
१०) सर्व प्रकारची धार्मिक स्थळे मा. राज्य शासनाच्या पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.
११) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये रात्री ११.०० वाजेपर्यंत जमावबंदी असेल व रात्री ११.०० ते पहाटे ०५.०० वाजेपर्यंत (अत्यावश्यक कारण वगळता) संचार बंदी लागू राहील.
१२) या आदेशातील नमूद बाबी व्यतिरिक्त इतर बाबीसाठी दि.२६.०६.२०२१ निर्गमित आदेश लागू राहतील.
१३) मा. राज्य शासनाने व इकडील संदर्भीय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश/मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. कोविड १९ च्या प्रतिबंधासाठी केंद्र सरकार/राज्य शासन आणि या कार्यालयाद्वारे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६० तसेच भारतीय दंड संहितेचे कलम १८८ नुसार अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहील. असे आदेश पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी आज (दि.०८) रोजी जाहीर केले आहेत.

























Join Our Whatsapp Group