पिंपरी (Pclive7.com):- कोकणात महापूराने अतोनात आर्थिक व जीवितहानी होऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कोकणावर आलेल्या या संकटाला सामोरे जाण्यासाठी व आपल्या बांधवांसाठी ‘कोकण-खेड युवाशक्ती’च्यावतीने “पुन्हा एक हात कोकणासाठी, कोकणच्या मातीसाठी, कोकणवासीयांसाठी” या संकल्पनेद्वारे पिंपरी चिंचवड शहरातील बांधवांनी सामाजिक बांधिलकी जपत आर्थिक व वस्तू स्वरूपात मदत केली.
कोकण-खेड युवाशक्तीच्यावतीने खेड तालुकामधील अनेक नुकसानग्रस्त गावामधील वडगाव, कळबणी खुर्द, बिरमणी, कांदोशी, किंजळे तर्फे खेड, नांदिवली केळेवाडी, नांदिवली दंडवाडी, नांदिवली आखाडेवाडी, नांदिवली खुंटेवाडी, आंबवली, म्हाळुंगे, देवघर, कुडोशी, भरणेनाका, वेरळ येथील नुकसानग्रस्त १५० कुटुंबियांना अन्नधान्य किट, शैक्षणिक शाळेय साहित्य वाटप व २ कुटुंबियांना रोख रक्कम स्वरूपाची कर्तव्यारूपी मदत करण्यात आली.
बिरमणी येथे दरड दुर्घटनेत मृत पावले आहेत. त्या कुटुंबाला कोकण खेड युवाशक्ती पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
कोकण खेड युवाशक्तीच्या या मदत कार्यात कोकण खेड युवाशक्तीचे अध्यक्ष अभिजितभाऊ कदम, सचिव अंकुरभाऊ चव्हाण व युवाशक्तीचे २० ते २५ युवा सहकारी यांनी मदतीचे नियोजन व योगदान केले. तसेच पिंपरी चिंचवड शहरातील समाज बांधवांनी सहकार्य केले. त्याबद्दल कोकण-खेड युवाशक्तीने सर्वांचे आभार मानलेत.

























Join Our Whatsapp Group