पिंपरी (Pclive7.com):- सांगवी परिसरात संकल्प वेल्फेअरच्या वतीने ७५ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने “वृक्षरोपण”करण्यात आले.
वृक्ष ही राष्ट्रीय संपत्ती असून ती वाढवण्यासाठी वृक्षरोपण व त्याचे संवर्धन ही काळाची गरज आहे. यावेळी सुजित पोंगडे, अंकित नाईक, शुभम ढमाले, पराग ढोरे, ऋषभ कांबळे, आशुतोष आबनावे, शिरतेश आगरवाल आदींच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त ७५ वृक्ष लावण्यात आले.
यावेळी सुजित पोंगडे म्हणाले की, करू वृक्षाचे संवर्धनराखू पर्यावरणाचं संतुलन!, विकास करत असताना पर्यावरणाचा समतोल ढळणार नाही याची दक्षता घ्यायला पाहिजे. येत्या काळात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
























Join Our Whatsapp Group