भोसरी (Pclive7.com):- भोसरीत प्रज्योतभाऊ फुगे प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळी निमित्त महिला बचत गटांच्या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा सौ. पूजाताई महेशदादा लांडगे यांच्या हस्ते आज (दि.२४) या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी तरुण तडफदार व्यक्तिमत्व प्रज्योतभाऊ फुगे, मिशन स्वावलंबन क्षेत्रीय समन्वयक सुजाता परदेशी, सह्योगिनी सुदर्शना पाटील, सह्योगिनी निशा निमसे, सह्योगिनी अहिल्या साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
चला दिवाळी सण साजरा करूया.. आपल्या बचत गटातील महिलांकडूनच खरेदी करू या.. पिंपरी चिंचवड महानगरपालिका व महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत मिशन स्वावलंबन प्रकल्पातील १५ महिला बचत गटांसाठी दिघी रोड भोसरी येथे प्रज्योतभाऊ फुगे यांनी महिला सक्षमीकरण हेतूने स्टॉल उपलब्ध केले आहेत.
यावेळी सौ. पूजाताई महेशदादा लांडगे यांनी महिलांच्या कार्याला व प्रज्योतभाऊंच्या या हातभाराला शुभेच्छा दिल्या. महिला सक्षमीकरणाचा हा कार्यक्रम दि.२४ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोंबर रोजी पर्यंत सकाळी ११ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत चालू असणार आहे.
तरी परिसरातील सर्व नागरिकांनी या स्टॉलला भेट द्यावी आणि महिलांच्या उद्योगाला हातभार लावावा असे आवाहन प्रज्योतभाऊ फुगे यांनी केले आहे.