पिंपरी (Pclive7.com):- केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योग मंत्रालयामध्ये तरुणांना सक्षम करणाऱ्या अनेक योजना आहेत. त्या त्यांनी अभ्यासल्या पाहिजेत. मी त्यांना पूर्ण सहकार्य करेल असे आश्वासन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिले.
भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच राज्यातील युवा उद्योजकांनी त्यांची दिल्ली येथील निवास स्थानी त्यांची भेट घेतली. स्फूर्ती योजना, व्हेंचर कॅपिटल फंड, स्टार्ट अप इंडिया या सारख्या केंद्राच्या अनेक योजनांवर सविस्तर चर्चा झाली.
उद्योग चालू करण्यासाठी तरुण तरुणींनी पुढे येऊन अभ्यासुवृत्तीने शासकीय योजनांचा फायदा घेणे गरजेचे आहे असे नारायण राणे म्हणाले.
अमित गोरखे यांनी राज्यातील तरुणांकडून आलेली प्रकरणांची शिफारस माननीय मंत्री महोदयांकडे केली. या प्रसंगी प्रशांत तांबे, रवींद्र शेळके, भीमराव मरसाळे, राज गुप्ता, सीए योगेश लकडे उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group