नाराजी दूर करण्या चा प्रयत्न करु; अशा निर्णयाची अपेक्षा नव्हती
मोशी प्रभाग क्रमांक ३ मध्ये भाजपाकडे सक्षम उमेदवार
पिंपरी (Pclive7.com):- मोशीतील बोराटे कुटुंबियांचे माझ्या राजकीय जीवनात महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यामुळे नगरसेवक वसंत बोराटे यांच्या निर्णयाबाबत मला कोणतेही राजकीय हेवेदावे करणार नाहीत, अशी भूमिका भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली.
मोशी प्रभाग क्रमांक ३ मधील भाजपा नगरसेवक वसंत बोराटे यांनी पदाचा राजीनामा दिला. तसेच, विकासकामे आणि मोशीकरांच्या स्वाभिमानाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
याबाबत आमदार महेश लांडगे म्हणाले की, माझ्या राजकीय जीवनात मोशी गावातील प्रतिष्ठीत व्यक्तीमत्व बबनराव बोराटे यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहीले आहे. २०१४ पासून आणि त्यापूर्वीही त्यांनी मला केलेल्या मदतीची परतफेड होवू शकत नाही. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोप, हेवे-दावे आणि नाराजी होणे क्रमप्राप्त आहे.
वसंत बोराटे यांनी राजीनामा दिल्याचे समजले. त्यांनी अशाप्रकारे निर्णय घेणे अपेक्षीत नव्हते. त्यांची समजूत काढण्याचा आम्ही प्रयत्न करु मात्र, तसे न झाल्यास भाजपाकडे त्या प्रभागातून अनेक पर्याय उपलब्ध आहेत. बोराटे यांच्या निर्णयाबाबत माझ्या मनामध्ये कोणतेही राजकीय हेवेदावे नाहीत. बोराटे कुटुंबियांवरती आम्ही राजकीय आरोप-प्रत्यारोप करणार नाहीत, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.



























Join Our Whatsapp Group