पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पाणी पुरवठा विभाग प्रभाग क्र.९ खराळवाडी, गांधीनगर, भागासाठी बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन आज (दि.११) रोजी करण्यात आले.

सदर ठिकाणी २० लाख लिटर क्षमतेची पाण्याची उंच टाकी व १० लाख लिटर क्षमतेच्या पंपच्या कामाची उभारणी करण्यात आली. प्रभागातील नगरसेवक राहुल भोसले, गीता मंचरकर, वैशाली घोडेकर, समीर मासुळकर यांच्या प्रयत्नातून खराळवाडी, गांधीनगर व कामगारनगर परिसरातील नागरिकांचा अनेक वर्षापासूनचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
सदर उद्घाटनाला श्री. रामनाथ टकले, कार्यकारी अभियंता श्री.किरण अंदुले, उपअभियंता, श्री. विपीन थोरमोठे, कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group