पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी पार्किंग पॉलिसी सुरू केली होती. मात्र, शहरातील राजकीय पक्षांनी त्यास विरोध केला होता. त्यामुळे ही पॉलिसी बंद केली होती. २१ मार्चपासून शहरात वाहनतळ धोरण राबविण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनो सावधान, नो पार्किंगमधील वाहनांवर कारवाई होणार आहे.

शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनतळ धोरणाची अंमबलजावणी दि.१ जुलै २०२१ पासून सुरू झाली होती. धोरण राबविताना पार्किंग केलेल्या ठिकाणी लावण्यात आलेल्या वाहनधारकांकडून पार्किंग शुल्क घेण्यात येत होते. मात्र, नो पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनधारकांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत नव्हती. त्यामुळे आता पोलीस विभागाच्या मदतीने टोईंग व्हॅनद्वारे वाहने उचलण्याचे नियोजन केले आहे, असे वाहतूक नियोजन विभागाचे बापुसाहेब गायकवाड यांनी सांगितले.
धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे. वाहने ठेवण्यासाठी चार ठिकाणे निश्चित करण्यात आलेली आहेत. त्यामध्ये निगडी भक्ती शक्ती उड्डाणपुलाखालील जागा, पिंपरी इंदिरा गांधी पुलानजीक मोकळी जागा, सांगवी वाहतुक विभाग कार्यालया शेजारी – सांगवी 1 फाटा व चिंचवड एस. के. एफ कंपनीसमोरील वाहतूक पोलिस चौकीच्या जागेचा समावेश आहे.– राजेश पाटील, आयुक्तधोरण राबविण्यासाठी दि.१५ मार्चला आयुक्त यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी पोलीस आयुक्त उपस्थित होते. त्यात धोरणाची दि.२१ मार्चपासून प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय झाला. नो पार्किंग मध्ये लावलेल्या वाहनांवर महाराष्ट्रातील इतर मनपाच्या धर्तीवर दंड आकारण्यात येणार आहे. नागरिकांनी आपले वाहन निश्चित केलेल्या अधिकृत पार्किंगच्या जागेवर लावावे, दंडात्मक कारवाई टाळावी.– कृष्ण प्रकाश, पोलीस आयुक्त
























Join Our Whatsapp Group