औरंगाबाद (Pclive7.com):- राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही, तर कोण कधी कोणासोबत जाईल याचाही अंदाज लावणे अवघड असते. असाच काही राजकीय भूकंप आणणारी बातमी समोर येत असून, एमआयएम आणि राष्ट्रवादीच्या दोन मोठ्या नेत्यांमध्ये युतीच्या मुद्यावर चर्चा झाली आहे. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील आणि राज्याचे आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी नेते राजेश टोपे यांच्यात ही भेट झाली आहे.

जलील यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, दोन दिवसांपूर्वी टोपे यांनी जलील यांच्याघरी जाऊन त्यांची बैठक घेतली. यावेळी राजकीय चर्चा सुद्धा झाली. तर प्रत्येकवेळी आम्हाला भाजपचं बी टीम म्हणतात मग राष्ट्रवादीसोबत आम्ही युती तयार करायला असल्याची ऑफर आम्ही त्यांना दिली असल्याचं जलील म्हणाले. त्यामुळे आता यावर काय रिप्लाय येणार हे पाहू, असे जलील म्हणाले.
पुढे बोलताना जलील म्हणाले की, मुळात एमआयएमला सोबत घेणे कुणालाच पाहिजे नाही पण मुस्लिम मते सर्वांना पाहिजे. त्यामुळे काँग्रेसला वाटत असेल तर त्यांनीही यावे आम्ही त्यांच्यासोबत सुद्धा युती करायला तयार आहोत. आज घडीला देशाच सर्वात मोठा नुकसान जर कुणी करत असेल तर ते भाजप आहे. त्यामुळे भाजपचा पराभव करण्यासाठी जे काय करावे लागेल ते करण्यासाठी आम्ही तयार आहोत असेही जलील म्हणाले.
























Join Our Whatsapp Group