आळंदी (Pclive7.com):- देशातील आरोग्य व्यवस्था कणखर बनवण्यासाठी अनेक ठिकाणी ऑक्सिजन लिक्वीड प्लांट शासना मार्फत उभारण्यात येत आहेत. कोरोनाच्या महाभयंकर संक्रमणाच्या काळात आळंदी मध्ये कोरोना झालेल्या काही रुग्णांचा प्राणवायूचा स्तर खाली गेला होता. त्यांच्यासाठी प्राणवायू सिलेंडर भेटावा याकरिता अनेक नातेवाइकांची धावपळ ही दिसत होती.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरातील आरोग्य व्यवस्थेला मोठा तडाखा बसला. त्यावेळेस च्या रुग्णवाढीमुळे देशातील शहरात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरच्या बेडची मागणी वाढली. याच काळात ऑक्सिजन कमी पडू लागल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले होते.
आळंदी ग्रामीण रुग्णालयात ही १३ किलो लिटर क्षमतेचा ऑक्सिजन लिक्विड प्लांट शासनामार्फत उभारण्यात आला आहे. कोरोनाकाळात ग्रामीण रुग्णालयाची ही ऑक्सिजन सिलेंडर पुरवठा करण्यासाठी त्यावेळेस दमछाक झाली होती. ऑक्सिजन लिक्विड प्लांट असल्याने आळंदी ग्रामीण रुग्णालयाची कायमची चिंता मिटली आहे. अशी माहिती आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.गणपतराव जाधव यांनी दिली. यामुळे प्राणवायू आवश्यक असणाऱ्या रुग्णांना प्राणवायू रुग्णालयात उपलब्ध होणार असून रुग्णांसाठी तो वरदान ठरणार आहे.
























Join Our Whatsapp Group