मुंबई (Pclive7.com):- राजकीय भूकंपात मोठी बातमी समोर येतेय. संजय राऊतांना ईडीनं समन्स पाठवलं आहे. जमीन घोटाळाप्रकरणी संजय राऊतांना ईडीने समन्स पाठलं आहे. उद्या २८ जून रोजी त्यांना ईडी चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. राऊतांना पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प कथित जमीन घोटाळा प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. आधीच शिवसेनेत शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा वाद सुरू आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालंय. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे. हे असताना संजय राऊतांना मोठा ईडीचा मोठा झटका बसल्याचं बोललं जातंय.

पत्राचाळ घोटाळा काय?
2006 मध्ये जॉईंट व्हेंचरअंतर्गत गुरू आशिष बिल्डरने पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला. हा प्रकल्प 2008 मध्ये सुरू झाला. मात्र, दहा वर्षानंतरही पत्राचाळीचा पुनर्विकास झाला नसल्याचे लक्षात आले. मूळ 678 रहिवाशांना वाऱ्यावर सोडून म्हाडाच्या घरांना देखील बिल्डरने चुना लावल्याची माहिती होती. या बिल्डरने म्हाडाला 1 हजार 34 कोटींना फसवले होते. बिल्डरने विक्रीचे क्षेत्र सात त्रयस्थ विकाससकांना विकल्याचा आरोप आहे. या गुरू आशिष कंस्ट्रक्शन कंपनीचा संचालक राकेश वाधवान आहे. वाधवान यांच्यासोबत संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊतांचा संबंध आहे. प्रवीण राऊत यांनी राकेश वाधवानसोबत मिळून पत्राचाळीच्या पुनर्विकास प्रकल्पात घोटाळा केल्याचा संशय आहे. या प्रकरणी प्रवीण राऊत यांना अटक आणि सुटका झाली. त्यानंतर पुन्हा 2 फेब्रुवारी 2022 रोजी प्रवीण राऊत यांना पुन्हा अटक झाली.
राऊत ते राऊत कनेक्शन
प्रवीण राऊतांच्या खात्यातून संजय राऊतांच्या पत्नीच्या खात्यात 55 लाख रुपये गेले होते. पण, हे पैसे 10 वर्षानंतर परत केले. हे पैसे कर्ज म्हणून घेतल्याचा दावा संजय राऊतांच्या पत्नीने केला होता. पण, संजय राऊतांचा देखील या घोटाळ्यात सहभाग असल्याचा संशय ईडीला होता. त्यामुळे ईडीने संजय राऊतांच्या कुटुंबीयांवर छापेमारी केली होती. याच घोटाळ्याप्रकरणी ईडीने आज संजय राऊतांची मालमत्ता जप्त केली आहे. पत्राचाळ घोटाळ्यातील पैसा संजय राऊत यांनी वापरल्याचा ईडीला संशय आहे.
























Join Our Whatsapp Group