मुंबई (Pclive7.com):- मुंबईतील गोरेगाव येथील पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी अखेर संजय राऊतांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने अटक झाली आहे. दिवसभराच्या मारेथॉन चौकशी नंतर मध्यरात्री ईडीने संजय राऊतांना अटक केलीय. रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीच्या पथकाने संजय राऊतांच्या विक्रोळी येथील निवासस्थानी धाड टाकली. तब्बल नऊ तासांच्या चौकशीनंतर सायंकाळी ईडीने राऊतांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना ईडीच्या कार्यालयात आणण्यात आले. तिथे त्यांची पुन्हा चौकशी करण्यात आली. यानंतर साडे बाराच्या सुमारास ईडीने त्यांना अटक केल्याची घोषणा केली.

तब्बल १५ तांसाहून अधिक काळ ईडीकडून संजय राऊतांची चौकशी
संजय राऊत यांच्या घरी ईडीची धाड पडल्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. ईडीकडून संजय राऊतांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते असा हाय व्होल्टेज ड्रामा दिवसभर पहायला मिळाला. विक्रोळी येथील निवास स्थानी तब्बल साडे नऊ तास चौकशी. यानंतर ईडीच्या कार्यालयात सात तासांहून अधिक काळ चौकशी झाली. तब्बल १५ तांसाहून अधिक काळ ईडीकडून संजय राऊतांची चौकशी सुरु होती. यानंतर अखेरीस यानंतर साडे बाराच्या सुमारास ईडीने त्यांना अटक केली.
संजय राऊतांच्या घरी सापडलेल्या दहा लाखांच्या बंडलावर लिहिलेय ‘एकनाथ शिंदे अयोध्या’
ईडी चौकशीनंतर संजय राऊत यांच्या निवासस्थानी ईडीला ११ लाख ५० हजार रुपयांची रोकड सापडली आहे. दहा लाखांच्या बंडलावर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असे लिहिलेले आहे. उरलेले दीड लाख रुपये हे आमचे असल्याचे संजय राऊतांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले त्याचबरोबर ईडीकडे काही कागदपत्रे आहेत, त्यात वर्षा संजय राऊत यांचा उल्लेख असल्याचीही माहिती मिळतेय.
काय आहे पत्रा चाळ घोटाळा
संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊतांना या घोटाळा प्रकरणात ईडीनं अटक केलीय. आणि सध्या ते कोठडीतच आहेत. राऊतांच्या मागे पत्राचाळ प्रकरण आणि ५५ लाखांच्या व्यवहारामुळं ईडी लागलीय, गोरेगावच्या सिद्धार्थ नगरमध्ये ६७२ घरांच्या पुनर्विकासासाठी रहिवाशांनी म्हाडा आणि बिल्डरसोबत करार केला. १३ एकरपैकी साडेचार एकरवर मूळ रहिवाशांना घरं दिली जातील आणि उर्वरित भागात म्हाडा आणि बिल्डर विक्री करेल असंही ठरलं. मात्र जमिनी गुरु आशिष बिल्डर आणि अधिकाऱ्यांनी परस्पर खासगी बिल्डरांना विकल्याचं समोर आलं. पत्राचाळ प्रोजेक्ट संदर्भात १३ मार्च २०१८ ला म्हाडाच्या कार्यकारी अभियंत्याकडून तक्रार करण्यात आली.
संजय राऊतांविरोधात वाकोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पत्रा चाळ घोटाळा प्रकरणातील महत्त्वाचा दुवा असलेल्या स्वप्ना पाटणकर यांच्या तक्रारीनंतर संजय राऊतां विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत संजय राऊतांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिली. बलात्कार करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार स्वप्ना पाटकणर यांनी केली होती. पाटणकर यांना आलेल्या धमीच्या पत्रात किरीट सोमय्या यांचे देखील नाव होते. यामुळे या धमकी प्रकरणात संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली होती. त्यानुसार वाकोला पोलिस ठाण्यात संजय राऊतांविरोधात भारतीय दंड संहिता कलम 509,506,504 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
Tags: ED EnquiryED raids on Sanjay Raut houseSanjay rautSanjay Raut Arrestईडीकडून अटकशिवसेनेचा आवाजशिवसेनेचा आवाज कैदसंजय राऊत
























Join Our Whatsapp Group