पिंपरी (Pclive7.com):- काळेवाडी येथील माने शाळेच्या विद्यार्थ्यांनी शालेय उपक्रमा अंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिका कार्यालयास भेट दिली. यावेळी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना राख्या बांधून विद्यार्थीनींनी रक्षाबंधन साजरा केला.

काळेवाडी येथील विद्यादीप विद्यालय (माने शाळा)च्या विद्यार्थ्यांनी शालेय उपक्रमा अंतर्गत, स्वतः राख्या तयार केल्यात. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरा केला. यावेळी प्रशासकीय कामकाज विषयीचे महत्त्व विद्यार्थ्यांनी जाणून घेतले.
या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे डॉ.अक्षय गंगाराम माने सर यांनी केले होते. यास मुख्याध्यापक सौ.अर्चना विनायक दुधाळ, तसेच शिक्षक सौ.मुळे उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group