पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहरात राबविलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये ३७ जणांवर कारवाई करण्यात आली. तसेच नाकाबंदीत एकूण ९७४ वाहने तपासून ८१ वाहनांवर कारवाई केली.

मोका, खून, दरोडा, जबरी चोरी आदी गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेणे तसेच तडीपार गुन्हेगारांचे निवासस्थान तपासणे यासाठी सोमवारी मध्यरात्री शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. सर्व पोलिस ठाणे व गुन्हे शाखेसह एकूण पाच सहायक पोलिस आयुक्त, २६ निरीक्षक, ५५ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, ४९६ अंमलदार यांची पथके तयार केली होती.
या ऑपरेशनमध्ये रेकॉर्डवरील ३९० आरोपी तपासले. यामध्ये ३७ जणांवर कारवाई करण्यात आली. तसेच नाकाबंदीत एकूण ९७४ वाहने तपासली. यामध्ये ८१ वाहनांवर कारवाई करून ५१ हजार ३२५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
























Join Our Whatsapp Group