पिंपरी (प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड शहरातील नेहरुनगर येथील आणासाहेब मगर स्टेडियम लगत असलेल्या नाल्यामध्ये एका महिलेचा मृतदेह पोत्यामध्ये आढळून आला आहे. महिलेचा खून करून मृतदेह नाल्यात आणून टाकला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महिलेची ओळख पटलेली नाही. हा प्रकार नागरिकांना समजल्यानंतर पोलिसांना सांगितले. पिंपरी पोलिस घटनास्थळी गेले आहेत. या प्रकरणात नेमके काय घडले आहे हे अद्याप समजू शकले नाही.






















Join Our Whatsapp Group