पुणे (Pclive7.com):- शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतविलेल्या ४ कोटी रुपयांच्या बदल्यात २० कोटी रुपयांची मागणी करुन व्यावसायिकाचे अपहरण करणार्या कुख्यात गुंड गज्या मारणेच्या मुसक्या पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक – 2 नं आवळल्या आहेत. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला सातारा जिल्ह्यातील वाईमधून ताब्यात घेतले आहे. गज्या मारणे हा अॅड. विजयसिंह ठोंबरे यांच्या वाई येथील फार्म हाऊसवर कायदेशीर सल्ला घेण्यासाठी गेला होता. तेथून पोलिसांनी गज्या मारणेला ताब्यात घेतलं आहे.

गजानन उर्फ गज्या पंढरीनाथ मारणे याला पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – 2 चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे आणि कर्मचार्यांनी ताब्यात घेतले आहे.
गुंड गजानन मारणे याने सांगली व पुण्यात शेअर व्यवसाय करणार्या एका व्यावसायिकाचे वसुलीसाठी अपहरण केले होते. त्याला मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यात खंडणी विरोधी पथकाने चौघांना अटक केली आहे. त्यात या व्यावसायिकाचे अपहरण केल्यानंतर तपासात प्रकाश बांदिवडेकर यानेही धमकाविल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याचा शोध घेतला असता तो इंदूरमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने इंदूरमधून त्याला ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यात १४ जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यांच्यावर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. प्रकाश बांदिवडेकर हा १५ आरोपी आहे.
खंडणी प्रकरणात सचिन ऊर्फ पप्पु दत्तात्रय घोलप (वय ४३, रा. धनकवडी), हेमंत ऊर्फ आण्णा बालाजी पाटील (वय ३९,रा. बुरली, ता. पलुस, जि. सांगली), अमर शिवाजी किर्दत (वय ४६, रा. कोडोवली, जि. सातारा), फिरोज महंमद शेख (वय ५०, रा. समर्थनगर,कोडोवली, जि.सातारा), गजानन ऊर्फ गजा ऊर्फ महाराज पंढरीनाथ मारणे (रा. शास्त्रीनगर, कोथरुड) (टोळीप्रमुख), रुपेश कृष्णाराव मारणे (रा.कोथरुड), संतोष शेलार (रा.कोथरुड), मोनिका अशोक पवार (रा. दोपोडी), अजय गोळे (रा.नर्हे), नितीन पगारे (रा.सातारा), प्रसाद खंडागळे (रा.तळजाई पठार, सहकारनगर), नवघणे यांच्यावर मोक्का कारवाई करण्यात आली आहे.
खंडणी विरोधी पथक – 2 चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, सहायक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे, पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव, श्रीकांत चव्हाण, पोलीस अंमलदार विजय गुरव, प्रदिप शितोळे, शैलेश सुर्वे, राहुल उत्तरकर, विनोद साळुंके, अनिल मेंगडे, सचिन गायकवाड, संग्राम शिनगार, सचिन अहिवळे, सैदोबा भोजराव, सुरेंद्र साबळे, अमोल पिलाणे, चेतन आपटे, चेतन शिरोळकर, प्रदिप गाडे, सुरेंद्र साबळे, विनोद शिवले, अकबर शेख पवन भोसले, रवि सपकाळ व महिला पोलीस अंमलदार आशा कोळेकर, रुपाली कर्णवर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
























Join Our Whatsapp Group