पिंपरी (प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड शहरातील यमुनानगर पोलीस चौकीसमोर झालेल्या मारहाणी संदर्भात तब्बल अकरा दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भाजपचे नगरसेवक तुषार हिंगे याच्यावर जिवे मारण्याचा प्रयत्न, मारहाण व बेकायदा शस्त्र बाळगण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुषार हिंगे याच्यासह प्रदीप हिंगे, राहुल गवारे, रोहीत गवारे, विशाल बाबर, शिवराम चिखले, हेमंत भोसले, अरविंद भोकरे,चंदन, गोविंद सातपुते, रवींद्र तळेकर, ऋशिकेश तळेकर, दादा तळेकर अशा अन्य वीस आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी महेश नारायण गारुळे (वय ४८ रा. मोशी प्राधीकरण,) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, गारुळे त्यांच्या मित्रासह यमुनानगर पोलीस चौकी येथे आले असता तुषार हिंगे व त्याचे साथीदार गाडीतून आले व शिवीगाळ करत गारुळे यांच्यावर तलवारीने वार केला. हा वार चुकवल्यानंतर त्यांनी गारुळेच्या डोक्याला पिस्तूल लावले. मात्र पिस्तुलाचा चाप न दबल्याने तेथील सिमेंटचा गट्टू त्यांच्या डोक्यात मारला. तसेच गारुळे यांच्या मित्रासही मारहाण केली. ही मारहाण पैशाच्या देवाणघेवाणीवरून झाल्याचे पालिसांनी सांगितले आहे.
हा प्रकार दस-याच्या दिवशी पोलीसचौकी समोर घडूनही कोणी फिर्याद न दिल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता, मात्र गारुळे यांनी याप्रकरणी तुषार हिंगे याच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर त्याच्याविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे, मारहाण असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणासही अटक केली नसून पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत.
























Join Our Whatsapp Group