पिंपरी (Pclive7.com):- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या प्रदेश महिला आघाडीच्या वतीने पिंपरी चिंचवडमध्ये सोमवार (दि.३१) रोजी राज्य कार्यकरिणीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला केंद्रीय राज्य मंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

सदर बैठक हॉटेल कलासागर, पुणे-मुंबई रस्ता, कासारवाडी येथे दु.१२ वाजता होणार आहे. या बैठकीस संपूर्ण महाराष्ट्रामधून महिला पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. महिला आघाडीचे संघटन वाढवणे, महिलांच्या प्रश्नांवर महिलांनी काम करावे, अशा अनेक विषयावर चर्चा होणार असल्याची माहिती महिला आघाडीच्या अध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे यांनी दिली आहे.





















Join Our Whatsapp Group