पिंपरी (प्रतिनिधी):- तक्रार मिटवण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच स्विकारताना भोसरी पोलिस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक आणि कर्मचाऱ्यास पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रंगेहात पकडले. दरम्यान तीन दिवसात पुणे पोलिस दलाततील ही दुसरी कारवाई आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
सहाय्यक निरीक्षक नाळे आणि पोलिस कर्मचारी चौधरी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तक्रारारदार यांचे घरगुती भांडण आहे. याप्रकरणी त्यांच्या विरोधात भोसरी पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. ही तक्रार मिटवून घेण्यासाठी ५० हजाराची लाच घेताना पकडण्यात आले आहे.
























Join Our Whatsapp Group