(संदेश पुजारी, pclive7.com):- एकनाथ पवार…! पिंपरी चिंचवड मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर वेगाने पुढे आलेले नाव…! नुकताच त्यांचा वाढदिवस झाला….वाढदिवसाच्या निमित्ताने शहरभर त्यांचे लागलेले शुभेच्छांचे फ्लेक्स अनेकांच्या भुवया उंचवणारे ठरले..! खरं तर भाजपमध्ये जुन्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना काडीची किंमत नाही असा सूर पिंपरी चिंचवडमध्ये असताना एकनाथ पवार मात्र त्याला अपवाद ठरत आहेत. अर्थात त्याला त्यांची कामाची पद्धत जबाबदार आहे हे ही तितकंच खरे… महापालिकेची सूत्र काही मोजक्या लोकांच्या हातात असल्याची ओरड होत असताना एकनाथ पवार ही निर्णय प्रक्रियेत असल्याचे स्पष्ट जाणवते…! अर्थात हे अचानक घडले असं म्हणायला वाव नाही..! या मागे आगामी विधानसभा निवडणुकांची गणिते नाकारता येत नाहीत.. एकनाथ पवार भोसरी विधानसभा मतदार संघातले.. भोसरी मतदार संघ महेश लांडगे यांचा.! महेश लांडगे हे जरी भाजप सहयोगी आमदार असले तरी त्यांच्या विरोधात एक गट काम करतोय हे उघड गुपित आहे..! महेश लांडगे यांना शह देण्यासाठी जाणीवपूर्वक काही जण एकनाथ पवार यांना आमदारकीच्या तिकिटाचे स्वप्न दाखवत आहेत..! त्याला एकनाथ पवार यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांचा युक्तिवाद देत आहेत..समजा विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकत्र झालीच तर महेश लांडगे यांची जागा तुम्हालाच घ्यावी लागेल असे अनेकजण सांगत आहेत….! अर्थात त्यामागे महेश लांडगे यांना शह देण्याची काहींची रणनिती आहे हे सांगायला कोण्या ज्योतिषाची गरज नाही..! त्याचमुळे एकनाथ पवार यांची ताकत वाढलेली दिसत नाही ना असा प्रश्न उपस्थित होतोय…! आता कारण काहीही असो, जुन्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये एकनाथ पवार यांची ताकत अनपेक्षितपणे वाढली आहे हे ही खरे आहे आणि त्याचमुळे अनपेक्षितपणे उद्या एकनाथ पवार आमदार झाले तर आश्चर्य वाटायला नको…! अर्थात हा जर तर चा खेळ…! पण तूर्तास त्यांना झालेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…!