पिंपरी (Pclive7.com):- सराईत दुचाकी चोरट्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून सहा लाख रुपये किमतीच्या १३ दुचाकी जप्त केल्या. त्याच्याकडील एका चावीचा वापर करून आरोपी दुचाकी चोरी करीत होता. चोरीच्या दुचाकी गायरान भागात झाडाझुडपात लपवून ठेवत होता. भोसरी पोलिसांनी ही कारवाई केली.

रामेश्वर नवनाथ अडकिने, असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनचोरीचे प्रकार वाढल्याने तपास करण्याबाबत आदेश देण्यात आले. त्यानुसार भोसरी पोलिस ठाण्याचे तपास पथकातील सहायक निरीक्षक कल्याण घाडगे आणि उपनिरीक्षक मुकेश मोहारे यांनी तपास सुरू केला. दोन पथके तयार करून चोरट्यांचा शोध घेण्यात आला. वाहनचोरी करणारा एकजण भोसरी येथील स्मशानभूमीजवळ वाहन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून कारवाई केली. यात रामेश्वर अडकीने याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता दुचाकी चोरीच्या आठ गुन्ह्यांची उकल झाली. त्याच्याकडून १३ दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या.
सहायक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे, भोसरीचे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भास्कर जाधव, निरीक्षक (गुन्हे) अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक कल्याण घाडगे, उपनिरीक्षक मुकेश मोहारे, सहायक फौजदार राकेश बोयणे, पोलिस कर्मचारी खरात, डगळे, जाधव, पोरे, केंद्रे, खाडे, जाधव, गोपी, महाडिक, सातपुते, वराडे, नरवडे, जगदाडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
साथीदाराच्या मदतीने करायचा चोरी..
रामेश्वर अडकीने याने भोसरी, भोसरी एमआयडीसी, दिघी, चिखली, महाळुंगे, चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत व पिंपरी तसेच. चिंचवड परिसरातील दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. रामेश्वर अडकीने हा त्याचा साथीदार परशुराम कांबळे याच्यासोबत मिळून चोरी करीत होता.

























Join Our Whatsapp Group