पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड़ शहर व इखलास सय्यद मित्र परिवाराच्या वतीने आकुर्डी येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालायात सोमवार दिनांक 2 जानेवारी २०२३ रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे

या शिबिरात मोफत नेत्र तपासणीसह मोती बिंदु मोफत व अल्पदरात शस्त्रक्रिया करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. नेत्रतज्ञ डॉ. नीलेश चाकणे यांच्या विशेष सहकार्य यावेळी लाभणार आहे.
तसेच प्रत्येक महिन्याच्या दर सोमवारी दुपारी १२ ते २ या वेळेत या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी विधानसभेचे कार्याध्यक्ष इखलास सय्यद यानी दिली.
























Join Our Whatsapp Group