पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात आंदोलन केले. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आंदोलकांनी तीव्र घोषणा दिल्या.
पिंपरीतील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात महिला शहराध्यक्षा व नगरसेविका वैशाली काळभोर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात माजी महापौर व नगरसेविका अपर्णा डोके, माजी नगरसेविका अनिता तापकीर, मंदा आल्हाट, शकुंतला भाट तसेच संगीत जाधव, पुष्पा शेळके, सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्षा गंगा धेंडे, मिनाक्षी उंबरकर, सविता धुमाळ, पौर्णिमा पालेकर, देवी थोरात, शिला भोंडवे, दिपाली देशमुख, सुवर्णा काळभोर, नलिनी शेडगे, दिपाली गायकवाड, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, प्रवक्ते फजल शेख आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
एक नोव्हेंबरपासून विनाअनुदानित गॅस सिलेंडर ९३ रुपयांनी महागला आहे. अनुदानित गॅस सिलेंडरचे दर ४.५६ रुपयांनी वाढले आहेत. या वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
”विकास वेडा झाला…माझा संसार उद्धवस्त झाला”, ”बया…बया…..गॅस लय महागला”….”बया…बया….






















Join Our Whatsapp Group