पिंपरी (Pclive7.com):- स्वाईन फ्लूमुळे अहमदनगर येथे राहणा-या ४२ वर्षीय इसमाचा उपचारा दरम्यान पिंपरीत मृत्यू झाला. स्वाईन फ्लूची लागण असलेले ४१० रूग्ण जानेवारीपासून आतापर्यंत शहरात आढळले आहेत. त्यातील ६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
अहमदनगर येथील ४२ वर्षीय इसमाला स्वाईन फ्लूची लक्षणे आढळल्यावरून २७ ऑक्टोबर रोजी पिंपरी चिंचवड येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्वाईन फ्लूचा त्रास वाढल्याने रुग्णाला त्याच दिवशी कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना गुरुवारी दि.२ रोजी रुग्णाचा मृत्यू झाला.






















Join Our Whatsapp Group