पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पिंपरी चिंचवड शहर शिवजयंती उत्सव समिती तसेच भक्ती-शक्ती शिवजयंती महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने निगडी येथे भक्ती-शक्ती चौकामध्ये पाच दिवस शिवजयंती महोत्सव आयोजन केले होते. यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केल होते. त्याचबरोबर रक्तदान शिबिराचे आयोजनही केले होते. या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.
या रक्तदान शिबिरामध्ये उपआयुक्त रविकिरणजी घोडके तसेच जनसंपर्क विभागाचे पुराणिक यांनी रक्तदान करून शिबिरामध्ये भाग घेतला होता. तसेच कल्पना गिड्डे, जेष्ठ समाजसेवक मारुती भापकर, सचिन चिखले, नकुल भोईर, सागर तापकीर, संदीप नवसुपे, प्रकाश जाधव, गणेश भांडवलकर, धनाजी येळकर, जीवन बोराडे, सतीश काळे तसेच इतर सर्व भक्ती शक्ती शिवजयंती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरास भरपूर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये ५०१ बॅग रक्त संकलित करण्यात आले. रक्तदात्याला रक्तदानाच्या बदल्यात रक्ताची पिशवी मोफत देण्यात येणार आहे. तसेच त्याच्या नातेवाईकांना जर भविष्य कधी रक्ताची गरज पडली तर ७५ टक्के सवलतीच्या दरामध्ये रक्तपिशवी देण्यात येईल. यासोबत आकर्षक भेट म्हणून एक हेल्मेट तथा ट्रॅव्हल बॅग देण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या वतीने प्रत्येक रक्तदात्याला शिवविचार हे एक पुस्तके भेट म्हणून देण्यात आले.