पिंपरी (Pclive7.com):- चेन स्नॅचिंग, वाहन चोरी, मोबाईल चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यास प्रतिबंध व्हावा व गुन्हे उघडकीस आणावेत यासाठी खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखेला तपासाचे आदेश वरिष्ठांनी दिले होते. रावेत पोलीस ठाण्यातील गुन्हा रजि.नं. १२० / २०२३ भादवि कलम ३९२,३४ या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना सीसीटीव्ही फुटेज तसेच गुप्त बातमीद्वारे गुन्हेगाराची माहिती मिळाली. रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार रामा पाटील व पांडा सुतार यांनी गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2023/04/IMG-20230415-WA0028-1-300x150.jpg)
पांडा सुतार हा लातूर येथे असल्याने खंडणी विरोधी पथकाने लातूर येथे जावुन शोध घेतला. प्रदीप उर्फ पांडुरंग लहु सुतार (वय ३२ वर्षे रा.बी २९, गजानननगर, रहाटणी. काळेवाडी फाटा) हा न्यू रेल्वे स्टेशन रोड, लातुर येथे मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवुन, त्याचेकडे विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार रामा पाटील याच्यासह केल्याची तोंडी कबुली दिल्याने त्याला ताब्यात घेवुन रावेत पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास रावेत पोलीस स्टेशन हे करत आहे. आरोपी प्रदीप उर्फ पांडुरंग लहु सुतार हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन, त्याच्याविरुध्द दरोडा, जबरी चोरी, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, गंभीर दुखापत व वाहनचोरीचे एकुण ७ गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीकांत दिसले यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, सुनिल कानगुडे, प्रदीप गोडांबे व आशिष बोटके यांच्या पथकाने केली आहे.