पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे गुरव येथील जिनियस क्लासेसने एसएससी बोर्ड परीक्षेत १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. क्लासेसची विद्यार्थीनी समृद्धी काकडे हिने ९५ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. संस्कृती जाधवने 89.80 टक्के गुण मिळवत द्वितीय तर दर्शिल गायकवाड याने 88.40 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला.

क्लासमधील सार्थक कांबळे (86.40), श्रीराज जगताप (82.80), दृष्टी गायकवाड(81.60), मानसी सुतार (80.60), तृप्ती कापसे (79.20) या विद्यार्थ्यांनी देखील घवघवीत यश संपादित केले आहे. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जिनियस क्लासेसमध्ये प्रत्येक विषयांसाठी तज्ञ, अनुभवी व उच्च शिक्षित शिक्षक आहेत. क्लासमध्ये वर्षभर आमचा चांगल्या प्रकारे सराव करून घेतला. जास्तीत जास्त उत्तर पत्रिका सोडवून घेतल्या. गेस्ट लेक्चर्सचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे मोठ्या आत्मविश्वासाने परीक्षेस सामोरे जाता आले. माझ्या या यशात जिनियस क्लासेसचा मोठा वाटा आहे.– समृद्धी काकडे व संस्कृती जाधवविद्यार्थिनी, जिनियस क्लासेस






















Join Our Whatsapp Group