पिंपरी (Pclive7.com):- विधानपरिषदेच्या आमदार उमाताई खापरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी दिलेल्या देणगीतून केलेल्या शाळेतील कामांचे उद्घाटन माजी मंत्री तथा विधानसभा विस्तारक योजना प्रदेश संयोजक कृपाशंकर सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

तसेच निगडी प्राधिकरण येथील ज्ञानप्रबोधिनी शाळेत सभामंडपाचे उद्घाटन करण्यात आले. आकुर्डी येथील बिना इंग्लिश मिडीयम शाळेत वर्ग व प्रयोग शाळेचे उद्घाटन केले. श्रीमती गोदावरी हिंदी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय चिंचवड येथे वेदर शेडचे उद्घाटन केले व शाळेला संगणक व स्क्रीन भेट देण्यात आले. त्याचप्रमाणे आदित्य बिर्ला हॉस्पिटल समोर बस स्टॉपचे उद्घाटन करण्यात आले. याप्रमाणे सर्व समावेशक कार्यक्रमांचे उद्घाटन आमदार उमाताई खापरे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले.

यावेळी सर्व शाळांचे प्राचार्य, चेअरमन, जिल्हाध्यक्ष शंकरभाऊ जगताप, माजी खासदार अमर साबळे, सदाशिव खाडे, नामदेव ढाके, अमित गोरखे, अनुप मोरे, राजू दुर्गे, केशव घोळवे, माऊली थोरात, संजय मंगोडेकर, रीदाताई राशिद, संजीवनीताई पांडे, आशाताई काळे, राजश्री जायभाय, गीता महेंद्रु, अश्विनीताई जिचकार, शोभाताई भराडे, नयनाताई मनतकर, दिपालीताई धनोकार, तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group