पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये आज दुपारच्या सुमाराला जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर एसटी बसचा अपघात झाला. बोरवली ते पुणे बस दुपारी दोनच्या सुमारास मदर टेरेसा उड्डाण पुलाच्या इथे ग्रेड सेपरेटरमध्ये हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार चालकाचे नियंत्रण सुटल्याने एसटी बस डिव्हायडरवर जावून धडकली. बसमध्ये ३२ प्रवासी होते. सुदैवाने या अपघातात कोणीही मोठी दुखापत झाली नाही. सर्व प्रवासी सुखरूप असून त्यांना पर्यायी बसची व्यवस्था करण्यात आली आहे.