पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने पिंपरी-चिंचवड परिसरातील संघासाठी दि.१७ ते दि.२७ ऑक्टोबर या कालावधीत खुली, टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा कै. चंद्रकांत साठे (आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच) यांच्या स्मरणार्थ घेण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी असोसिएशनचे सचिव राजू कोतवाल, खजिनदार संजय शिंदे, नरेंद्र कदम, प्रदीप वाघ, मनोज कदम आणि डॉक्टर मृदुला महाजन उपस्थित होत्या.
पिंपरी-चिंचवड शहरामधील खेळाडूंसाठी क्रीडा नैपुण्य दाखवण्याची ही एक उत्तम संधी आहे. याच स्पर्धेतून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड “पिंपरी-चिंचवड प्रीमियर लीगसाठी” करण्यात येईल असे स्पर्धेची माहिती देताना जगदीश शेट्टी म्हणाले. तसेच सचिव राजू कोतवाल यांनी माहे नोव्हेंबर २०२३ मध्ये आंतरशालेय (मुलांची व मुलींची) १४ व १७ वर्षाखालील गटांकरिता क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले.
कै. चंद्रकांत साठे (आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच) स्मरणार्थ टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा पिंपरी-चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने पिंपरी-चिंचवड परिसरातील (पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय क्षेत्र) संघासाठी खुली, टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा कै. चंद्रकांत साठे (आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच) यांच्या स्मरणार्थ घेण्यात येणार आहे. सदर स्पर्धा दि.१७ ऑक्टोबर ते दि.२७ ऑक्टोबर २०२३ च्या दरम्यान “सिल्वर क्रिकेट मैदान, चिखली” व “परंदवाल क्रिकेट मैदान”,देहू येथे होणार आहे. ही स्पर्धा गुलाबी चेंडूवर व बाद पद्धतीने खेळली जाणार आहे. एकूण ३२ संघांचा समावेश या स्पर्धेत असेल. प्रत्येक संघामध्ये १५ खेळाडू असतील. सर्व संघाचा गणवेश पांढरा असावा. या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क रुपये १०,०००/- असून संघाची नोंदणी करण्याची शेवटची तारीख ५ ऑक्टोबर २०२३ आहे.
या स्पर्धेत संघाची नोंदणी करताना खेळाडूंची ओळखपत्रे, रहिवासी दाखला म्हणून पाहिली जातील. खेळाडू किमान तीन वर्ष पिंपरी-चिंचवड परिसराचा रहिवासी असावा. या स्पर्धेत प्रथम क्रमांकास पारितोषिक रुपये २५,०००/- व चषक, द्वितीय क्रमांकास पारितोषिक रुपये २१,०००/- व चषक, तृतीय क्रमांक पारितोषिक रुपये १०,०००/- व चषक देण्यात येणार असून प्रत्येक सामन्यास सामनावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक व उत्कृष्ट यष्टिरक्षक अशी बक्षिसेही ठेवण्यात आलेली आहेत.
यास्पर्धेच्या संघ नोंदणीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा..
राजू कोतवाल (८६६८६८६७१४),
नरेंद्र कदम (९८२२३७०६८८),
डॉ.मृदुला महाजन (९७६४०४००२२)
प्रदीप वाघ (९७६३७१२०७०).