पिंपरी (Pclive7.com):- भोसरी येथील श्रेया जगदाळे हीची सोलापूर येथे राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी १७ वर्षांखालील मुलींचा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. श्रेया हि १३ वर्षांची आहे व ती आदिनाथ क्रिकेट क्लब मध्ये दैनंदिन सराव करत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने सोलापूर येथे विभागीय स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. विभागीयस्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये श्रेया हिने चमकदार कामगिरी केली होती. अकळूज, मळशिरस येथे होणाऱ्या राज्यस्तरीय १७ वर्षाखालील मुलींचा निवड चाचणी स्पर्धेसाठी श्रेयाची निवड झाली आहे.
श्रेया ही १३ वर्षाची असून सिद्धेश्वर शाळेतील विद्यार्थिनी आहे. ती इयत्ता आठवीत शिकत आहे. शालेय क्रिकेट स्पर्धेत तिने सिद्धेश्वर हायस्कूल संघातून प्रतिनिधित्व केले होते. श्रेया भोसरीतील आदिनाथ क्रिकेट क्लबची खेळाडू आहे. ती दैनंदिन सराव महारष्ट्र व विद्यापीठ खेळाडू प्रशिक्षक विजय जगदाळे यांचा मार्गदर्शनाखाली करीत आहे. या कामगिरीबद्दल शाळेची मुख्याध्यापिका सुजाता सावंत, शारीरिक शिक्षक राहुल धोत्रे व राधा मोरे तसेच शाळेतील शिक्षक यांनी तिचे अभिनंदन केले.