पुणे (Pclive7.com):- पुण्याच्या जिल्हाधिकारी पदाचा डॉ. सुहास दिवसे यांनी पदभार स्वीकारला आहे. डॉ. राजेश देशमुख यांनी कारभाराची सर्व सूत्रे त्यांच्याकडे सोपवली आहेत.
काल पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. सुहास दिवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर तर क्रिडा व युवक सेवा आयुक्तपदी डॉ. राजेश देशमुख यांची बदली करण्यात आली आहे.
डॉ. सुहास दिवसे यांनी पुणे जिल्ह्यातील विविध महत्वाच्यापदावर काम पाहिले आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील प्रश्नांची त्यांना माहिती आहे. पुणे जिल्ह्यात कार्यरत असताना त्यांनी क्रिडा आयुक्त, पीएमआरडीए आयुक्त, निवासी उपजिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिले, खेड प्रांतधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे. २००९ च्या आयएएस बॅचे ते अधिकारी आहेत. पीएमआरडीए विकास आराखडा मार्गी लावण्यामध्ये दिवसे यांचे योगदान मोठे राहिले आहे.























Join Our Whatsapp Group