पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांचे आहे असे निवडणूक आयोगाने जाहीर केले. याचाच निषेध करण्यासाठी आज पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध आंदोलन करण्यात आले.
तुषार कामठे म्हणाले की सरकारी यंत्रणेचा गैरवापर व गद्दारांना खतपाणी घालायचे काम भाजप करत आहे म्हणून मी भाजपचा जाहीर निषेध करतो. काही कार्यकर्त्यांनी मुंडन करून निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचा जाहीर निषेध केला.
यावेळी सरचिटणीस जयंत शिंदे, सुलक्षणा धर, देवेंद्र तायडे, वरिष्ठ उपाध्यक्ष काशिनाथ जगताप, महिला अध्यक्षा ज्योती निंबाळकर, सामाजिक न्याय अध्यक्ष मयूर जाधव, अल्ताफ शेख, प्रशांत सपकाळ, अरुण थोपटे, विवेक विधाते,जयंत शिंदे, वंदना आराख, गणेश काळे, दिलीप पानसरे, राहुल धनवे, अण्णा पाखरे, विशाल जाधव, डीएम ढोले, प्राजक्ता जाधव, रंजना फ्रान्सिस, वैशाली मिडगुळे, हेमंत बळकवडे, अनिल भोसले, योगेश सोनवणे, संजीवनी पुराणिक, विनोद धुमाळ, रूपाली भडाळे, विजयकुमार अंबड, जनाबाई जाधव, संजय पडवळ, अशोक तनपुरे, समीर शेख, केडी वाघमारे, आशिष पांढरे, राजू खंडागळे, हनुमंत वाबळे, शोल कांबळे, राजकुमार माने, राजेश सोमानी, श्रीकांत पवार, राजरत्न शीलवंत, रिचर्ड पीटर, रेखा मोरे, सुधीर घोरपडे, नितीन मोरे, संदेश जगताप, अजित सूर्यवंशी, शोभा साठे आणि अविनाश कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी काळ्या रंगाचे कपडे घालून आपला निषेध नोंदवला.























Join Our Whatsapp Group