पिंपरी (Pclive7.com):- बोपखेल, गणेशनगर कॅालनी नं.२ येथे राहणाऱ्या कु.गिरीजा गणेश शिंदे या ३ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. रस्त्यावर खेळत असताना त्यांच्या घराशेजारी असणाऱ्या वृंदावन सोसायटीचे गेट गिरीजाच्या अंगावर पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर घटना अत्यंत दुर्दैवी व ह्रदय पिळवटून टाकणारी होती. याबाबत शिवसेनेच्या वतीने दिघी पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांना निवेदन देऊन त्या सोसायटीच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

याप्रसंगी पिंपरी-चिंचवड शहर संघटक सरिता साने, युवासेनेच्या युवती जिल्हाध्यक्ष प्रतिक्षा घुले, शाखाप्रमुख रामसिंग गिल, उपशाखाप्रमुख कृष्णा मोरे, युवानेते संदिप माने उपस्थित होते.
वृंदावन सोसायटीच्या मालकाला वारंवार सांगून व विनंती करून देखील सदर मालकाने या बाबतीत दुर्लक्ष केले. त्याची शिक्षा निरागस गिरीजा व तिच्या कुटुंबीयांना भोगावी लागली. गिरीजाच्या जाण्याने तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परमेश्वर त्यांना या दु:खातुन सावरण्याची शक्ती देवो अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. तसेच संबंधित सोसायटी मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
























Join Our Whatsapp Group