माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांकडून ठराव करत थेट अजित पवारांना इशारा
चिंचवड (Pclive7.com):- चिंचवड विधानसभेत अजित पवार गटाने तातडीने एक बैठक घेतली आहे. ही जागा घड्याळाला मिळाली नाही तर आम्ही महाविकास आघाडीत प्रवेश करू, असा एकमताने ठराव माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

पुनावळे येथील एका हॉटेलमध्ये आज (दि.०४) ही बैठक संपन्न झाली. यावेळी इच्छुक उमेदवार नाना काटे, मोरेश्वर भोंडवे आणि मयूर कलाटे हे देखील हजर होते. मोरेश्वर भोंडवे, मयूर कलाटे, प्रशांत शितोळे आणि विनोद नढे या माजी नगरसेवकांनी शरद पवारांची भेट आधीचं घेतली आहे. तसेच नाना काटे हे देखील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. मात्र अजित पवारांना पुन्हा एकदा इशारा देण्यासाठी आजची बैठक आज घेण्यात आली होती.

चिंचवडची जागा राष्ट्रवादीला घ्या आणि उमेदवारी आमच्यातील एकाला द्या. अन्यथा आम्ही महाविकास आघाडीत अर्थात तुतारी फुंकू असा इशारा थेट अजित पवारांना यावेळी देण्यात आला आहे.






















Join Our Whatsapp Group