चिंचवड (Pclive7.com):- दिवाळी पाडव्यानिमित्त चिंचवड येथील वीरशैव लिंगायत गवळी समाजाच्या वतीने “सगर उत्सव” साजरा करण्यात आला. गवळी समाजामध्ये गुढीपाडव्याच्या सणाला विशेष महत्त्व आहे.

या दिवशी म्हशी व रेडे यांना शिंगाला रंगरंगोटी करून घाटी घुंगराच्या माळा घालून, अंगावरती नक्षी काढून गुलाल वगैरे टाकून छानसं सजवलं जातं. त्यानंतर त्यांना सगर उत्सव ज्या ठिकाणी भरण्यात आला आहे. त्या ठिकाणी मिरवणुकीने घेऊन येतात. सर्व गवळी समाजातील नागरिक या उत्सवात सहभागी होतात. तसेच ही मिरवणूक पाहण्यासाठी अनेक नागरिक देखील त्या ठिकाणी उपस्थित होते.

चिंचवड येथे समाजातील प्रमुख कारभारी मंडळी खंडूशेठ बहिरवाडे, आदिनाथ मिसाळ, लक्ष्मण नामदे, सुरेश लंगोटे, चंद्रकांत आलंकार आदींनी पुढाकार घेऊन सगर उत्सवाचे आयोजन करतात. सगरावर म्हशी घेऊन येणाऱ्या प्रत्येक समाजबांधवाचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात येतो अशी माहिती वीरशैव लिंगायत गवळी समाज ट्रस्टचे अध्यक्ष माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी दिली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना मिठाई वाटप करून कार्यक्रमाचे सांगता झाली.
























Join Our Whatsapp Group