नवी दिल्ली (Pclive7.com):- दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वात धक्कादायक निकाल समोर आला आहे. भारतीय जनता पार्टीने अभूतपूर्व यश मिळवतानाच दुसरीकडे आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा तसेच माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे.

नवी दिल्ली मतदारसंघातून अरविंद केजरीवाल पराभूत झाले आहेत. आपचा हुकुमी एक्का असलेले केजरीवाल पराभूत झाल्याने पक्ष कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे.

केजरीवाल 12 व्या फेरीनंतरही पिछाडीवर होते. 12 फेऱ्यांनंतर ते 3 हजार मतांनी पिछाडीवर होते. मतमोजणीची शेवटची फेरीमध्ये केजरीवाल यांनी बरेच मतं भरुन काढली. मात्र शेवटच्या फेरीनंतरही भाजपाचे परवेश वर्मा यांनी 1200 मतांनी विजय मिळवला असून हा दिल्ली निवडणुकीमधील सर्वात मोठा उलटफेर असल्याचं मानलं जात आहे.

























Join Our Whatsapp Group