पिंपरी (Pclive7.com):- लोकं विलासरावांना सतत आमच्याबद्दल बोलत असतात. कुणी म्हणतं मित्र आहेत तर कुणी म्हणतं राजकारणी आहेत. परंतू त्यांचं आणि माझं नातं काय आहे ते मलाच माहिते. विलासराव माझे गुरू आहेत. भोसरी हे विद्यापीठ आहे, आणि विलासराव पिंपरी चिंचवडच्या राजकारणाचे कुलगुरू आहेत. त्यांना आमदारांचे आमदार करून न्याय द्यावा अशी विनंती भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे केली.
विलास लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरीतील आज (शुक्रवारी) गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, पुण्याचे माजी उपमहापौर दिपक मानकर, विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर हनुमंत भोसले, रंगनाथ फुगे, योगेश बहल, मोहिनी लांडे, वैशाली घोडेकर, वसंत लोंढे आदी नगरसेवक उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group