पिंपरी (Pclive7.com):- रहाटणी येथील आनंद बुद्ध विहारात ६९वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. मिलिंद तायडे यांनी आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने उपस्थितांना बुद्ध धम्माचे महत्व आणि सामाजिक एकतेचे मूल्य पटवून दिले.
या विशेष प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या शैक्षणिक यशाला प्रोत्साहन देण्यात आले. या सोहळ्याला माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, आनंद बुद्ध विहाराचे अध्यक्ष महादेव कांबळे, सचिव श्री. कदम, महिला अध्यक्ष अनिता साळवी, अंजना कांबळे, खजिनदार शशिकांत शेलार, संघटक सखाराम कांबळे, बन्सी शिंदे, मनोहर लांडगे, प्रकाश सूर्यवंशी, गुलचंद गायकवाड, भाऊराव दहागावकर, शांता कांबळे, दहागावकर ताई, अलका लांडगे, प्रवीण लोखंडे, रामभाऊ मुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात बुद्ध धम्माच्या तत्त्वांचा प्रसार आणि शिक्षणाच्या महत्वावर विशेष भर देण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करून त्यांच्या उज्ज्वल भविष्याला शुभेच्छा देण्यात आल्या. सर्व उपस्थितांनी एकत्र येऊन या सोहळ्याला यशस्वी बनवले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारून केवळ स्वतःच्या जीवनाला नवीन दिशा दिली नाही, तर लाखो दलित आणि वंचितांना सामाजिक आणि आध्यात्मिक मुक्तीचा मार्ग दाखवला. त्यांचे कार्य आजही बौद्ध धर्म आणि सामाजिक समतेच्या चळवळीला प्रेरणा देत आहे.धम्मचक्र प्रवर्तन दिन हा बाबासाहेबांच्या सामाजिक क्रांतीचा आणि बौद्ध धर्माच्या पुनर्जननाचा उत्सव आहे, जो समता, करुणा आणि बुद्धी यांचे प्रतीक आहे.