
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी कॅम्प येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अरुण टाक यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत टाक यांचा प्रवेश झाला आहे.

चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृह येथे भाजपचा आज कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी पिंपरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अरुण टाक आणि आशा राकेश सौदाई यांनी त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे प्रवेश महत्त्वपूर्ण मानले जात आहेत. टाक आणि सौदाई यांच्या प्रवेशामुळे पिंपरी कॅम्प परिसरात भाजपाची ताकद निश्चितपणे वाढणार आहे.

या पक्ष प्रवेशावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे तसेच माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप, माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.


























Join Our Whatsapp Group