पिंपरी (Pclive7.com):- सामाजिक न्यायाचा दीप तेवत ठेवत कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी अखेरपर्यंत लढणाऱ्या बाबा आढाव यांच्या स्मृतींना व्यंगचित्रकार गणेश भालेराव यांनी अनोख्या आणि मनाला भिडणाऱ्या पद्धतीने अभिवादन केले आहे.

“सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार” या अर्थपूर्ण मथळ्याखाली साकारलेले भालेरावांचे भावनिक व्यंगचित्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आढावांच्या कार्यातील तेज, त्यांची जिद्द, आणि त्यांनी समाजासाठी वाहिलेलं आयुष्य या सगळ्याची कलात्मक सांगड या एकाच व्यंगचित्रात दिसून येते.

दरम्यान, हे चित्र पाहताक्षणीच अनेकांच्या मनात त्यांच्या संघर्षाची, त्यांच्या निःस्वार्थ सामाजिक कार्याची आठवण जागी होत आहे. कलाकाराच्या रेषांमधून उमटणारी शांतता, वेदना आणि आदर हे सर्व पाहून प्रेक्षक थबकतात आणि मनात एकच भावना दाटते: “असा समाजयोद्धा पुन्हा जन्माला येत नाही.” गणेश भालेराव यांच्या भावपूर्ण स्पर्शाने एक साधं व्यंगचित्रही आज मोठं विधान ठरलं आहे. समाजासाठी जगलेली माणसं जात नाहीत… ती लोकांच्या हृदयात कायमची जिवंत राहतात.

























Join Our Whatsapp Group