पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात घरफोडी करून परराज्यात धूम स्टाइलने फरार झालेल्या घरफोडी प्रकरणातील अट्टल चोरट्यांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा ३ च्या पथकाने अवघ्या ४८ तासांतच मोठ्या शिताफीने सापळा रचून अटक केलं आहे.

या कारवाईत पोलिसांनी मोसीन शौकतअली शेख (वय ३२ वर्षे रा. लोहियानगर सत्यकम, स्कुल जवळ, एम ब्लॉक, मेरठ उत्तर प्रदेश), उदयवीर मलखानसिंग सहासी (वय ३६ वर्षे रा. गल्ली नं ३ प्रतापनगर, जयभिम नगर, मेरठ उत्तर प्रदेश), विनय कुमार गंगासरन (वय ३४ वर्षे रा. ग्राम विजोली ठाणा, खरखोदा, मेरठ, उत्तर प्रदेश) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह तब्बल २५ लाख १३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व आरोपी मुळचे उत्तरप्रदेश मधील असून चोरी करण्यासाठी ते पिंपरी चिंचवड शहरात येत होते. आरोपी उत्तर प्रदेश वरून एका चारचाकी वाहनात दुचाकी घेऊन येत, पिंपरी चिंचवड शहरात आल्यावर हे चारचाकी वाहन लपवून दुचाकीवरून शहरात घरफोडी करून पुन्हा दूर लावलेल्या चारचाकी वाहनात दुचाकी ठेवून पुन्हा उत्तर प्रदेश मध्ये जात होते गुन्हे शाखा युनिट तीनच्या टीमने पुणे नाशिक हायवे ला वाकी चाकण येथे सापळा रतन शिताफीने आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन, एक दुचाकी वाहन, मोबाईल फोन, सोने चांदीचे दागिने आणि घरफोडी करण्यासाठी वापरलेले इतर साहित्य असा एकूण २५ लाख १३ हजार ५९८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना अटक केल्याने घरफोडीच्या ४ गुन्ह्यांची उकल झाली आहे. ही सर्व कामगिरी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे,पोलिस उप आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा तीनच्या पथकाने केली आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उप-आयुक्त गुन्हे डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३ वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलीस उपनिरीक्षक सुनिल जावळे, पोलीस अंमलदार बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बोऱ्हाडे, सागर सुर्यवंशी, श्रीधन इचके, संदिप सोनवणे, मनोज साबळे, रुषीकेश भोसुरे, अजित रुपनवर, स्वप्निल महाले, योगेश कोळेकर, शशिकांत नांगरे, बाळासाहेब भांगले, सुंदर थोरात, समिर काळे, सुधिर दांगट, दिलीप राठोड, तुषार वराडे, राजकुमार इघारे, निखील फापाळे, प्रदीप राळे, तांत्रिक विश्लेषक प्रकाश ननावरे यांनी केली आहे.
https://youtube.com/shorts/5PoE7b8b5Ks?si=Ou7jG7pm8lUlubV-
Tags: Pimpri Chinchwad Police

























Join Our Whatsapp Group