मॉस्को – जगभरातील फुटबॉल चाहत्यांचे लक्ष लागून असलेल्या फिफा विश्वचषकातील अंतिम सामन्यात अखेर फ्रान्सने बाजी मारली. फ्रान्सने क्रोएशियाला ४-२ अशी धुळ चारली आहे.
सामन्याच्या पूर्वार्धात दोनही संघांकडून जोरदार अॅक्शन पाहायला मिळाली. सामन्याच्या १८व्या मिनिटात फ्रान्सला फ्री किक मिळाली. फ्रान्सला मिळालेल्या फ्री किकचा बचाव करताना क्रोएशियाकडून मॅन्झुकिचने आत्मघातकी ओन गोल केला. त्यामुळे फ्रान्सला आघाडी मिळाली. मात्र हि आघाडी जास्त काळ टिकली नाही. २८ व्या मिनिटाला क्रोएशियाकडून पेरिसिचने गोल करून संघाला बरोबरी साधून दिली. त्यांनतर ३८व्या मिनिटाला फ्रान्सला पेनल्टी किक मिळाली. याचा फ्रान्सने लाभ घेतला. अनुभवी ग्रीझमनने थेट गोल करत फ्रान्सला आघाडी मिळवून दिली. त्यामुळे मध्यंतरापर्यंत फ्रान्सने २-१ अशी आघाडी राखली.
FIFA World Cup 2018 FINAL : अंतिम सामन्यात फ्रान्सची आघाडी; क्रोएशियाने केला आत्मघातकी ओन गोल
क्रोएशियाकडून पेरिसीचचा गोल; फ्रान्सशी १-१ने बरोबरीपेनल्टी
फ्रान्सला ‘लाभ’ली; ग्रीझमनच्या गोलमुळे फ्रान्स २-१ने पुढे
FIFA World Cup 2018 FINAL : हाफटाइमपर्यंत फ्रान्स २-१ने आघाडीवर
अनुभवी पोगबाचा दुसऱ्या प्रयत्नात गोल; फ्रान्स ३-१ने आघाडीवर
युवा एमबापेकडून गोल; फ्रान्स ४-१ने सुसाट…
मॅन्झुकिचचा गोल; क्रोएशियाने कमी केली आघाडी, ४-२ने पिछाडीवर
























Join Our Whatsapp Group