लोणावळा (Pclive7.com):- मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कार्ला फाटा येथे दोन कारच्या भीषण अपघातात ७ जण जागीच ठार झाले असून दोन जण जखमी झाले आहेत. हा अपघात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झाला.
संजू मोहनसिंह खुशवाह (वय 17), कृष्णा रमेश शिरसाट (वय 22), निखिल बालाजी सरोदे (वय 20, सर्व रा. अमरदीप सोसायटी, रहाटणी, पिंपरी चिंचवड), राजू जगन्नाथ बहिरट (वय 52), सोनाली राजू बहिरट (वय 46), जान्हवी राजू बहिरट (वय 20), जगन्नाथ चंद्रसेन बहिरट (वय 82, सर्व रा. कलाशंकर नगर, मुंढवा, पुणे) अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर प्रतीक बालाजी सरोदे (वय 18), आकाश मदने (वय 17) आणि रोहित कड (वय 16) अशी जखमींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात निघालेली स्विफ्ट कारच्या (MH 14 CX 8339) चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यानंतर सदर कार रस्ता दुभाजकावरुन विरुद्ध लेनवर जात पुण्याच्या दिशेने येणा-या सॅन्ट्रो कारला (MH 12 EX 1682) जोरात धडकली. त्यामुळे हा भीषण अपघात झाला. या अपघातात स्विफ्ट कारमधील पाच जण आणि सॅन्ट्रो कारमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, सॅन्ट्रो कारमध्ये असलेलले आणखी दोघे जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या अपघातानंतर पुण्याकडे जाणार्या मार्गावर सुमारे दोन किमी अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.






















Join Our Whatsapp Group