प्रभाग क्र.२८ मधील ज्येष्ठ नागरिकांशी अजितदादांनी साधला थेट संवाद
पिंपळे सौदागर (Pclive7.com):- पिंपळे सौदागर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम, दूरदृष्टी असणाऱ्या नेतृत्वाची गरज असून राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रभागाला असे नेतृत्व दिले आहे. त्यामुळे ही निवडणूक राष्ट्रीय राजकारणाची नसून स्थानिक समस्यांचे समाधान करणाऱ्या नेतृत्वाची निवड आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी केले.

पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक २८ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारी जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रभागातून ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, उमेश काटे, शितल काटे आणि मीनाक्षी काटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांना आशीर्वाद देण्यासाठी अनेक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
नाना काटे यांच्या नेतृत्वाचा गौरव करत अजित पवार म्हणाले की, “पिंपळे सौदागरला डेव्हलपमेंट झोन म्हणून ओळख मिळवून देण्यात नाना काटे यांचे मोलाचे योगदान आहे. विकासकामांबरोबरच लोकांसाठी २४ तास उपलब्ध राहणारे नेतृत्व म्हणजे खरे नेतृत्व म्हणून नाना काटे आपल्या प्रभागाचे नेतृत्व करत आहेत.
हिंजवडी आयटी पार्क उभारणीपासून या परिसराच्या विकासाचा पाया घातल्याचा उल्लेख करत त्यांनी आपल्या भागाचे नेतृत्व निवडताना कार्यक्षमता, प्रामाणिकपणा आणि विकासदृष्टी महत्त्वाची असल्याचे सांगितले.
वाहतूक कोंडीवर ठोस उपाय नाशिक फाटा – जगताप डेअरी मार्गावरील पिके चौक, कोकणे चौक, शिवार चौक येथे अंडरपास आणि उड्डाणपुलांची कामे काही मंजूर, तर काहीसाठी पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
कुंजीर चौक – रक्षक चौक रस्ता खुला करण्यासाठी प्रयत्न मागील निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्याने नाराजी व्यक्त करत हा रस्ता खुला करण्यासाठी निवडणुकीनंतर ठोस पावले उचलणार असल्याचे सांगितले.
ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र देशभरातून येथे स्थायिक झालेल्या कुटुंबांच्या ज्येष्ठांसाठी विशेष विरंगुळा केंद्र उभारण्याची घोषणा.
सांस्कृतिक भवन उभारणी बस डेपोच्या ३.५ एकर जागेवर बहुउद्देशीय सभागृह उभारून नागरिकांसाठी सांस्कृतिक उपक्रमाचे केंद्र निर्माण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुबलक पाणीपुरवठा पवना धरणातून बंदिस्त पाईपलाईन प्रकल्प आणि प्रभागात उभारलेल्या तीन मोठ्या टाक्यांमुळे पाणीटंचाईचा प्रश्न कमी होणार असल्याचा विश्वास व्यक्त.
हरित उपक्रम व पर्यावरण संवर्धन २०११ व २०१२ साली लावलेल्या हजारो वड-पिंपळ झाडांचा उल्लेख; तसेच साडेतीन किमीचा लिनियर अर्बन गार्डन ही महत्त्वाची देणगी असल्याचे सांगितले.
‘सेव्हन वंडर्स’ गार्डन पर्यटन आकर्षण नाना काटे यांच्या कल्पनेतून उभारण्यात आलेल्या जागतिक आश्चर्यांच्या प्रतिकृतींमुळे नागरिकांचा ओढा वाढल्याचे त्यांनी नमूद केले.
योगा पार्क व क्लाइंबिंग वॉल चार एकर जागेत योगा पार्क, ज्येष्ठ नागरिक केंद्र आणि जगातील उंच क्लाइंबिंग वॉलचे काम सुरू असल्याची माहिती.

“नाना काटे म्हणजे खरे लोकनायक”
कोविड काळातही २४x७ उपलब्ध राहून काम करणारे नेतृत्व म्हणजे नाना काटे असल्याचे त्यांनी सांगितले. “प्रचारापेक्षा अपघात ग्रस्त नागरिकांच्या मदतीला धावून जाणारे नेतृत्वच खरे लोकनायक म्हणून नाना काटे यांच्या रूपाने तुम्हाला लाभले आहेत” असे कौतुक त्यांनी केले. शहर स्वच्छ, स्मार्ट, प्रदूषणमुक्त, वाहतूक कोंडीमुक्त आणि पारदर्शक प्रशासन देण्यासाठी नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला साथ द्यावी, असे आवाहन अजित पवार यांनी केले.






















Join Our Whatsapp Group